Tue. Sep 27th, 2022

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा अशरफ गनी यांच्यावर निशाणा

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तानमधून अमेरिकन लष्कराला परत बोलवण्याचा निर्णय योग्य असल्याचं मत व्यक्त केलं आहे. तसेच अफगाणिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती आमच्या अपेक्षेपेक्षा फारच लवकर निर्माण झाली, अशी कबुलीही बायडेन यांनी दिली.

व्हाइट हाऊसमधील इस्ट रुममधून बायडेन यांनी अफगाणिस्तानमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित केलं.अफगाणिस्तानमध्ये अशरफ घनी यांचं सरकार पडून तालिबानच्या हातात संपूर्ण देश गेल्यानंतर बायडेन यांचं हे पहिलं भाषण होतं. बायडेन यांनी सध्याच्या अफगाणिस्तानमधील परिस्थितीसाठी अफगाणी नेत्यांना जबाबदार धरलं आहे. अफगाणी नेत्यांनी संघर्ष न करता हार मानली आणि देश सोडून पळून गेल्याचं मत बायडेन यांनी व्यक्त केलं आहे.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तानमधून अमेरिकन लष्कराला परत बोलवण्याचा निर्णय योग्य असल्याचं मत व्यक्त केलं आहे. तसेच अफगाणिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती आमच्या अपेक्षेपेक्षा फारच लवकर निर्माण झाली, अशी कबुलीही बायडेन यांनी दिली.

व्हाइट हाऊसमधील इस्ट रुममधून बायडेन यांनी अफगाणिस्तानमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित केलं. अफगाणिस्तानमध्ये अशरफ घनी यांचं सरकार पडून तालिबानच्या हातात संपूर्ण देश गेल्यानंतर बायडेन यांचं हे पहिलं भाषण होतं. बायडेन यांनी सध्याच्या अफगाणिस्तानमधील परिस्थितीसाठी अफगाणी नेत्यांना जबाबदार धरलं आहे. अफगाणी नेत्यांनी संघर्ष न करता हार मानली आणि देश सोडून पळून गेल्याचं मत बायडेन यांनी व्यक्त केलं आहे.

रविवारी अफगाणिस्तानमधील सरकार पडलं. अध्यक्ष घनी हे देश सोडून पळून गेले. तालिबानने काबूल या राजधानीच्या शहरावर ताबा मिळवला आणि संपूर्ण देश तालिबानच्या ताब्यात गेला. बायडेन हे खास या भाषणासाठी वॉशिंग्टनला आले आहेत. अमेरिकेमध्ये सत्तांतर झाल्यानंतर देशाच्या परराष्ट्र धोरणासंदर्भात बायडेन यांच्यासाठी हा काळ कसोटीचा ठरणार आहे.

अफगाणिस्तानमधून लष्कर मागे बोलवण्याच्या बायडेन यांच्या निर्णयावर सर्वच स्तरातून टीका झाली तरी त्यांच्या निर्णयावर कायम राहिले. आता अमेरिकेने अफगाणिस्तानमधील विमानतळांवर पुन्हा सैन्य पाठवण्याची तयारी केल्याने अमेरिकेच्या निर्णयांमध्ये संभ्रम दिसत असल्याची टीका केली जात आहे. अनेक देशांनी अफगाणिस्तानमधून आपल्या दुतावासातील नागरिकांना परत बोलावलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.