Sat. Jun 6th, 2020

#RAWTrailer: जॉन अब्राहमच्या ‘रोमिओ, अकबर, वॉल्टर’चा ट्रेलर रिलीज

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचा ‘रोमिओ, अकबर, वॉल्टर (Raw)’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

1971 च्या युद्धातील एका सत्य घटनेवर आधारित या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये जॉन अब्राहम वेगवेगळ्या लूकमध्ये दिसतोय.

या सिनेमात जॉन 18-20 अशा वेगवेगळ्या रूपात दिसणार आहे.

कधी पोलिसाच्या, कधी एका जखमी व्यक्तिच्या रूपात जॉनच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे आहेत.

तसेच या सिनेमात मौनी रॉय आणि जॅकी श्रॉफ यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

ट्रेलरमध्ये त्यांची झलक पाहायला मिळते. 2.46 मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये ज न एका गुप्तहेराची भूमिका साकारताना दिसतोय.

जॉनचा हा सिनेमा एका ख-या भारतीय गुप्तहेराच्या आयुष्यावर आधारित असल्याचं सांगण्यात येत आहे.

पाकिस्तानच्या सैन्यात सामील होऊन या गुप्तहेराने भारतीय सैन्यासाठी काम केले होते. रॉबी गरेवाल यांनी ‘रोमिओ, अकबर, वॉल्टर (RAW)’ या सिनेमाची पटकथा लिहिली आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शकही तेच आहेत. यापूर्वी त्यांनी व्हेन टाइम स्ट्राइक्स , एम पी3: मेरा पहला पहला प्यार आणि आलू चाट सारखे सिनेमे दिग्दर्शित केले आहेत.

जॉन अब्राहमचा ‘रोमिओ, अकबर, वॉल्टर (RAW)’ हा सिनेमा येत्या 5 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *