Wed. Oct 27th, 2021

एअर इंडियामध्ये जय हिंद; मेहबुबा मुफ्ती भडकल्या  

सूचना सत्र संपल्यानंतर विमानातील सर्व कर्मचाऱ्यांनी ‘जय हिंद’ म्हणावे असे परिपत्रक एअर इंडियाने सोमवारी संध्याकाळी जाहीर केले हे पत्रक उपदेशपर असून बंधनकारक नाही.

यावर देशभक्तीच्या ‘जोशाने’ आता आसमानही सोडलं नाही अशी टीका काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी केली आहे.

सोमवारी संध्याकाळी एअर इंडियाने एक परिपत्रक जाहीर केले आहे.

प्रवाशांसाठी प्रत्येक विमानामध्ये एक सूचनासत्र आयोजित केले जाते.

या सूचना सत्राअखेर सर्व क्रू मेंबर्सनी ‘जय हिंद’ म्हणावं अशी सूचना या पत्रकात करण्यात आली आहे.

एअर इंडिया ही सरकारी विमान कंपनी आहे. या परिपत्रकाबाबत समजताच मेहबुबा मुफ्ती यांनी त्यावर सडकून टीका केली आहे.

सार्वत्रिक निवडणूका जवळ आल्या असतानाच देशभक्तीच्या ज्वराने आसमान गाठलं आहे.

यामध्ये नवल काहीच नाही अशा आशयाचे ट्विट मेहबुबा मुफ्ती यांनी केलं आहे.

मेहबुबांच्या टिकेनंतर हे पत्रक आताचे नसून यासंदर्भात पहिली सूचना 2016 मध्ये जाहीर करण्यात आली होती. त्याचा आताच्या निवडणुकांशी काहीही संबंध नाही अशी सारवासारव एअर इंडियाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *