Sun. Aug 1st, 2021

सलमानची काही चुक नसतानाही …

अभिनेता सलमान खानच्या विरोधात डीएन नगर पोलीस ठाण्यात पत्रकार आणि कॅमेरामनला मारहाण केल्याप्रकरणी तसेच फोन हिसकावल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र या घटनेत सलमानची काही चुकी नसल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने म्हटलं आहे. सलमान खानने आपला व्हिडीओ काढण्यास नकार दिल्यानंतरही चाहता त्याचे व्हिडीओ काढत असल्यामुळे हा सर्व प्रकार घडल्याचे समजते आहे.

नेमकं प्रकरण काय ?

सलमान खान त्याच्या बॉडीगार्डसह सायकलिंग करत होता.

यावेळी सलमानला बघून चाहत्यांसह काही पत्रकारांनी सलमाचे फोटो काढण्यास सुरुवात केली.

सलमानने फोटो आणि व्हिडीओ काढण्यास नकार दिला.

मात्र तरीही व्हिडीओ आणि फोटो काढत असल्यामुळे त्याला राग आला.

त्याच रागच्या भरात त्याने पत्रकारचा फोन हिसकावून घेतला.

त्यामुळे या पत्रकाराने डीएन नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

मात्र सलमानने मुद्दाम केले नसल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने म्हटलं आहे.

तसेच सलमानच्या बॉडीगार्डने पत्रकाराला त्याचा फोन परतही केला.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *