Tue. Sep 28th, 2021

राज्य सरकारच्या निषेधार्थ पत्रकारांचे आंदोलन

राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आली असून याबाबत राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांनुसार पत्रकारांना लोकॅलमधून प्रवास करण्यास मुभा देण्यात आली नसल्याने आज राज्य सरकारच्या निषेधार्थ पत्रकार आंदोलन करत आहेत.

पत्रकार आणि पत्रकारितेतर कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवासाची मुभा मिळावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. राज्य सरकार पत्रकारांच्या मागणीकडे गांभीर्याने पाहात नाही. पत्रकारांच्या मागण्यांवर चर्चा सुरू असल्याचे सांगून राज्य सरकार वेळ काढू धोरण अवलंबित आहे, असं पत्रकारांचं म्हणणं आहे.मुंबई मराठी पत्रकार संघासह विविध पत्रकार संघटना राज्य सरकारसोबत पत्रव्यवहार करीत आहेत.

शासनाची ही भूमिका निषेधार्ह असून आज या भूमिकेविरोधात मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवन परिसरात पत्रकारांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन होणार आहे. या आंदोलनात सर्व पत्रकार संघटना आणि पत्रकारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई मराठी पत्रकार संघाने केले आहे.

संपादन: सिद्धी भरत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *