Tue. Jun 28th, 2022

छत्तीसगढच्या पत्रकारांनी ‘या’ कार्यक्रमाला हेल्मेट का घातले ?

छत्तीसगढ येथील रायपूर येथे भाजप नेत्यांची मुलाखत घेण्यासाठी पत्रकारांनी चक्क हेल्मेट घातले होते. काही दिवसांपूर्वी एका वृतवाहिनीचे पत्रकार सुमन पांड्ये यांना भाजप नेत्यांचा व्हिडीओ काढल्या प्रकरणी समर्थकांनी मारहाण केली होती. यासाठी भाजप आयोजीत एका कार्यक्रमाला रायपूरच्या पत्रकार हेल्मेट घालून पोहोचले होते. भाजप नेत्यांना संदेश देण्यासाठी आणि पत्रकारांच्या स्वत:च्या बचावाकरीता हेल्मेट घातल्याचे पत्रकारांनी सांगितले.

नेमकं काय घडलं ?

शनिवारी सुमन पांड्ये हे रायपूरच्या एक भाजप जिल्हास्तरीय नेत्यांच्या भाषणाचा व्हिडीओ रेकॉर्ड करत होते.

यावेळी रायपूरचे पक्षाचे अध्यक्ष राजीव अग्रवाल आणि उत्कर्श त्रिवेदी यांच्या बाचाबाची सुरू झाली.

हा सर्व प्रकार सुमन रेकॉर्ड़ करत असल्यामुळे पक्षाच्या समर्थकांनी व्हिडीओ काढण्यास मनाई केली.

त्यानंतर व्हिडीओ डिलीट करण्यास सांगितले.

सुमन यांनी व्हिडीओ डिलीट करण्यास मनाई केल्यामुळे त्यांना मारहाण करण्यात आली.

या मारहाणीत सुमन यांना डोक्याला दुखापत झाली.

या प्रकरणात चार भाजपच्या कार्यकर्त्यांसह रायपूर येथील पक्षाचे अध्यक्ष राजीव अग्रवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.