गंगेत स्नान करणाऱ्या महिलांचे फोटो प्रसिद्ध करू नये – उच्च न्यायालय

कुंभमेळ्यात गंगेत स्नान करणाऱ्या महिलांचे फोटो प्रसिद्ध करू नये असे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने वृत्तपत्र आणि संबंधित माध्यमांना दिले आहेत. तसेच या आदेशाचं उल्लंघन झाल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असाही इशारा उच्च न्यायालयाने दिला आहे. आसीम कुमार या व्यक्तिने ही याचिका दाखल केली असून यावर पुढील सुनावणी 5 एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने काय आदेश दिले ?

गंगा स्नान घाटाच्या 100 मीटर परिसरात फोटो काढण्यास मनाई दिली आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पीकेएस बघेल आणि पंकजा भाटिया यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहे.

तसेच या आदेशामुळे कोणत्याही प्रकारची नियतकालिकांना महिलांच्या आंघोळींचे फोटो छापता येणार नाही.

त्याचबरोबर वृत्तवाहिन्यांना आंघोळीचे दृश्ये दाखवता येणार नाही.

 

 

 

 

Exit mobile version