Sun. Aug 18th, 2019

नाशिककरांनो!… ‘अब दिल्ली दूर नही!’

57Shares

नाशिक-दिल्ली विमानसेवा नंतर आता नाशिकच्या नागरिकांना अवघ्या 17 तासात रेल्वेने दिल्लीला पोहचता येणार आहे. उद्यापासून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रासाठी महत्त्वाची असलेली अतिवेगवान राजधानी एक्सप्रेस पश्चिमऐवजी मध्य रेल्वेच्या मार्गाने धावणार आहे. या गाडीमुळे उत्तर महाराष्ट्राला फायदा होईल असं मत नाशिक मधील उद्योजकांनी व्यक्त केले आहे.

मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते दिल्लीतील हजरत निजामुद्दीन स्थानकादरम्यान धावणारी गाडी नाशिकरोड, मनमाड, भुसावळ येथे थांबेल. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना मुंबईत जाऊन दिल्लीची गाडी पकडावी लागणार नाही. केवळ 17 तासांत नाशिककरांना दिल्लीत पोहचणे शक्य होणार आहे.

नाशिक, नगर, औरंगाबाद, जळगाव, भुसावळ, धुळे येथील रेल्वे प्रवाशांना दिल्लीला जाण्यासाठी मुंबई येथून रेल्वेगाडी पकडावी लागत असे. यामुळे वेळ आणि पैसे यांचा भुर्दंड बसत होता. तसेच शारीरिक आणि मानसिक ताण सहन करावा लागत होता. आता त्यातून सुटका होणार आहे.

कधी सुरु होईल गाडी ?
आठवड्यातून दोन दिवस म्हणजे बुधवार आणि शनिवारी मुंबईहून ही गाडी मध्य रेल्वेमार्गे धावेल.
मुंबईहून ही गाडी दुपारी 2:20 वाजता सुटेल.
दिल्लीत दुसऱ्या दिवशी सकाळी 10:20 वाजता दिल्लीत पोहचेल.
येताना दिल्लीहून गुरुवारी आणि रविवारी सुटेल.
दिल्लीहून ती दुपारी 3:45 वाजता सुटून मुंबईला सकाळी 11:55 वाजता पोहोचेल.

शनिवारी सायंकाळी प्रथमच ही गाडी नाशिकरोड रेल्वेस्थानकावर येणार असल्याने शिवसेना कार्यकर्ते, प्रवासी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात स्वागत करणार आहेत.

राजधानी एक्सप्रेस कोठून रवाना होणार ?
खासदार हेमंत गोडसे यांनी राजधानी एक्सप्रेस पश्चिमऐवजी मध्य रेल्वे मार्गाने धावावी यासाठी दोन वर्षांपासून पाठपुरावा केला होता.

तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, तसेच विद्यमान रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली होती.

राज्यात मध्य रेल्वेचे 465 किमीचे जाळे असूनही दिल्लीला जाण्यासाठी अतिवेगवान रेल्वेगाडी उपलब्ध नाही.

गोडसे यांनी रेल्वे मंत्रालयाचे सचिव प्रवीण गेडाम यांच्या निदर्शनास आणून दिले होते.

राजधानी एक्सप्रेस मुंबई-कल्याण, नाशिक-मनमाड-भुसावळ या रेल्वेस्थानकांवरुन दिल्लीकडे रवाना होणार आहे.

57Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *