Fri. Oct 7th, 2022

आमदार बच्चू कडू यांना न्यायालयीन कोठडी

शिंदे गटाचे समर्थक आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांना गिरगाव कोर्टाने धक्का दिला आहे. राजकीय आंदोलन प्रकरणी बच्चू कडू यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे खळबळ उडाली आहे.

आमदार बच्चू कडू यांना गिरगांव कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बच्चू कडू यांच्याविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यामुळे ते स्वत: आज गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर झाले होते. बच्चू कडू यांच्याविरुद्ध राजकीय आंदोलन केल्या प्रकरणी दाखल केलेल्या निषेधाच्या गुन्ह्यात गिरगाव न्यायालयात हजर झाले होते. त्यांचा जामीन फेटाळण्यात आला असून न्यायालयाने त्यांना ताब्यात घेण्यात आदेश देत न्यायालयीन कोठडी सुनावल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.