Mon. Jan 24th, 2022

पुन्हा एकदा खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार जुही चावला

परंतू काही वर्षापासून  त्यांनी  चित्रपटात काम केले नाही मात्र आता चाहत्यांच्या उत्सुकतेमध्ये भर घालत  त्यांनी आता  वेब सिनेमाच्या माध्यमामध्ये काम करणे निवडले आहे.

अभिनेत्री जुही चावला यांनी अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर आता पुन्हा प्रेक्षकांच्या मनात आगळी-वेगळी छाप सोडण्यासाठी वेगळी भूमिका साकारताना दिसत आहे. विशेष म्हणजे ही भूमिका चित्रपटात नसून एका वेब सिनेमामध्ये साकारणार असल्याचे समोर आले आहे. आता पर्यंत जुही चावला यांनी कयामत से कयामत तक, स्वर्ग, हम है राही प्यार के, तीन दिवारे, दोस्ती, भूतनाथ अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र जुही चावला आता वेब सिनेमात खलनायिकाची भूमिका साकारणार असल्यामुळे चाहते प्रचंड उत्सुक आहेत.

जुही चावला वेब सिनेमामध्ये झळकणार ?

नव्वदीच्या दशकात प्रेक्षकांची मनं जिंकणारी प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला आता वेब सिनेमात काम करणार आहे.

पुन्हा सिनेसृष्टीत पर्दापण करताना जुही चावला यांनी वेब सिनेमांच्या माध्यमाची निवड केली.

“गुलाब गँग” या सिनेमानंतर जुही चावला ही आपल्याला पुन्हा एकदा खलनायिकेच्या रुपात दिसणार आहे.

या वेब सिनेमाची कथा ऐकली त्याचं क्षणी त्या कथेच्या प्रेमात पडले, असे जुही यांनी  सांगितले

आतापर्यंत चाहत्यांनी मला कधीही पाहिलेलं नसेल अशी भूमिका मी साकारणार असेल्याचे जुही चावला यांनी सांगितले.

मी ही भूमिका स्वीकारताना याबद्दल खूप विचार केला. मला या भूमिकेत पाहून सर्वांनाच नक्कीच आश्चर्य वाटेल असे जुही यांनी असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *