Sat. Jul 31st, 2021

वसई ते भाईंदर या स्थानकांदरम्यान जंबो मेगा ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर आज जंबो मेगाब्लॉक आहे. सकाळी 11 वाजता मेगा ब्लॉक सुरू होणार आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल. भाईंदर ते वसई रोड स्टेशन्सदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर हा मेगाब्लॉक असेल.

सिग्नल्स, ओव्हरहेड वायर्स आणि इतर यंत्रणांच्या दुरुस्तीसाठी हा मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे गरज असेल, तरच आज रेल्वेने प्रवास करा, असा सल्लाही पश्चिम रेल्वेकडून देण्यात आलाय.

यापूर्वीच्या रविवारी 26 जानेवारी रोजीही असाच मेगाब्लॉक होता. यावेळी बोरिवली ते राममंदिर स्टेशन दरम्यान हा मेगाब्लॉक होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *