Jaimaharashtra news

नागपुरात पोहचला जम्बो ऑक्सिजन टॅंक 

नागपूर : ऑक्सिजन  पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी १२५ मेट्रिक टन साठवणूक क्षमता असलेला लिक्विड मेडिकल ऑक्सिजन स्टोरेज जम्बो टॅंक नागपुरात दाखल झाला आहे. हा स्टोरेज टँक मनोरुग्णालयाच्या परिसरात बसविण्यात येणार आहे. सध्या अमरावती रोड, गोंडखैरी  येथे असून रात्री पर्यंत नागपुरात  दाखल होणार आहे. हा टॅंक १३ तारखेला चेन्नईवरून निघाला आहे. आज नागपूर सीमेवर पोहचला आहे. ५८ चाकं लागलेल्या कंटेनर मधून आणण्यात आला . हा टॅंक ९ दिवसाचा प्रवास करत नागपुरात पोहचला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी अनेकांना प्राण गमवावे लागले होते. त्यातून प्रशासनाने  धडा घेत ही व्यवस्था केली असून याचा फायदा नागपूरच नाही तर सदर्भाला सुद्धा होणार आहे. हा जम्बो टॅंक २० मीटर उंच तर ४० टन वजन असलेला देशातील सगळ्यात मोठा ऑक्सिजन स्टोरेज टॅंक असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Exit mobile version