Sun. May 31st, 2020

न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूप्रकरणाची सीबीआय चौकशी होणार नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

“न्यायाधीश बी. एच. लोया यांचा मृत्यू नैसर्गिकच होता. याप्रकरणातून केवळ न्यायव्यवस्थेची बदनामी करण्यात आलीयं त्यामुळे लोया मृत्यूप्रकरणाची एसआयटी किंवा इतर स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात येणार नाही”, असा स्पष्ट निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय.

हा निर्णय देताना लोया मृत्यूप्रकरणाची एसआयटी चौकशी करणारी जनहित याचिकाही न्यायालयानं फेटाळून लावली. न्यायाधीश लोया मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती अजय खानविलकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *