Sun. Jun 16th, 2019

‘मोदींनी देशाला मुस्लिम राष्ट्र होण्यापासून रोखावं!’

0Shares

मी स्पष्ट करू इच्छितोकोणी भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न करू नये. जर तसं घडल्यास भारतावर आणि जगावर संकट ओढावेल. माझा विश्वास आहे की मोदीजींचं सरकार या गोष्टीचं गांभीर्य समजून घेईल आणि त्यादृष्टीने पावलं उचलेल आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देशहिताचा विचार करून त्यांना पूर्ण सहकार्य करतील.’  हे विधान आहे मेघालय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. आर. सेन यांचं. न्यायमूर्ती सेन यांच्या या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींसाठी असलेल्या आचारसंहितेला अनुसरून हे विधान नसल्याचं सांगितलं जात आहे. पाकिस्तानबांग्लादेशम्यानमार यांसारख्या देशातील मुस्लिमेतर समुहांना भारताचे नागरिक बनण्याची परवानगी मिळावी यासाठी नियम बनवण्याचंही अपील यावेळी न्यायमूर्तींनी केलं आहे.

आपण भारतातील शांतताप्रिय मुस्लिमांच्या विरोधात नाही. पिढ्यानपिढ्या भारतात वास्तव्यास असणारे मुस्लिम भारतीय कायद्यांचं पालन करतात. त्यांना भारतात शांततेच्या मार्गाने राहू द्यायला हवं’, असंही भाष्य यावेळी सेन यांनी केलंय.

संविधानाला विरोध करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला भारतीय नागरिक मानता येऊ शकत नाही. आपण सर्वप्रथम भारतीय आहोतत्यानंतर एक चांगले मनुष्य आणि त्याच्यानंतर आपण कोणत्या समुदायाचे आहोतते गणलं जातं’, असंही न्यायमूर्ती सेन यांनी म्हटलं.

या सर्व वक्तव्यांमुळे भाजप विरोधकांनी न्यायमूर्ती सेन यांच्यावर टीका केली आहे. सोशल मीडियावरही सेन याच्या वक्तव्यावरून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या. तर काहीजणांनी मात्र या विधानांचं स्वागत केलंय. हे सत्य बोललं जाणं आवश्यक असल्याची भावना अनेकजणांनी व्यक्त केलीय. मात्र न्यायमूर्तींच्या प्रोटोकॉलमध्ये अशी वक्तव्यं बसतात का, यावरूनही कायदेतज्ज्ञांमध्ये वाद सुरू झाला आहे.  

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *