Mon. Aug 26th, 2019

राहुल बोस यांच्या व्हिडीओनंतर ‘त्या’ हॉटेलला 25000 रुपयांचा दंड

अभिनेता राहुल बोस यांना पंचतारांकित हॉटेलमध्ये दोन केळ्यांचं बिल 442 रुपये आकारण्यात आल्याने चांगलाच धक्का बसला. या हॉटेलला चंदीगढच्या उत्पादन शुल्क विभागाने 25 हजारांचा दंड ठोठावला आहे.

0Shares

राहुल बोस हा आगामी चित्रपटाचं चित्रीकरणासाठी चंदीगढ येथील जेडब्ल्यू मॅरिएट या पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्यास होता. या हॉटेलमध्ये त्याला दोन केळ्यांचं बिल 442 रुपये आकारण्यात आल्याने त्याला चांगलाच धक्का बसला. त्याने या संदर्भातील व्हिडीओ व्हायरल केला आहे. यामुळे या हॉटेलला चंदीगढच्या उत्पादन शुल्क विभागाने 25 हजारांचा दंड ठोठावला आहे.

2 केळ्यांचा दर 442!

अभिनेता राहुल बोस हा चित्रपटाचं चित्रीकरणासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्यास होता. सकाळच्या वेळेत वर्कआऊट करत असताना 2 केळी मागविली होती.

या केळ्यांच आकारलेलं बिल बघून राहुल चक्रावला. दोन केळ्यांसाठी तब्बल 442 रुपये आकारण्यात आले होते.

याप्रकारानंतर त्याने त्याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केला होता. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

त्यानंतर या प्रकरणाची दखल पंजाब सरकारच्या उत्पादन शुल्क विभागानेही घेतली. पंजाबच्या उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त मनदीप सिंग ब्रार यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते.

याची किंमत जास्त असल्याने या हॉटेलला या प्रकरणाचा चांगलाच फटका बसला आहे. या हॉटेलला 25000 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

 

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *