Mon. Oct 25th, 2021

ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडला

मध्यप्रदेशात काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना राजीनामा पाठवला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी हा राजीनामा दिला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांना प्रदेक्षाध्यक्ष आणि राज्यसभा उमेदवारी हवी होती. परंतु काँग्रेसने हे दोन्ही पदं नाकारली.

तसेच काँग्रेसच्या १९ आमदारांनी देखील राज्यपालांकडे राजीनामा दिला आहे. राजीनामा दिलेले हे आमदार शिंदे यांचे समर्थक असल्याचं समजत आहे.

या सर्व राजकीय नाट्यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात आलं आहे. मध्य प्रदेशमधील २०१८ च्या निवडणुकीत काँग्रेसला १२१ जागा मिळाल्या होत्या.

राजीनामा देण्याआधी ज्योतिरादित्य शिंदे यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक झाली. जवळपास दीड तास ही बैठक चालली.

मध्यप्रदेश विधानसभेची आकडेवारी

मध्यप्रदेश विधानसभेची एकूण सदस्यसंख्या ही 230 इतकी आहे. २ आमदारांचा मृत्यू झाला आहे. यानुसार विधानसभेची एकूण सभासदसंख्या ही २२८ इतकी आहे.

काँग्रेसचे एकूण ११४ आमदार आहेत. तर सरकार स्थापनेसाठी ११५ हा बहुमताचा आकडा आहे. काँग्रेसला ४ अपक्ष, बसपच्या २ आणि आणि सपाच्या १ आमदाराचं समर्थन आहे.

यानुसार काँग्रेसचे एकूण संख्याबळ हे १२१ इतके आहे. तर भाजपकडे १०७ आमदार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *