Tue. Dec 7th, 2021

‘KGF: Chapter 2’: नव्या पोस्टरवर यशचे कडक लूक, रिलीज

मुंबई : कन्नड अभिनेता यश याच्या ‘केजीएफ: चॅप्टर 2’ या चित्रपटाच्या रिलीजची चाहत उत्सुकतेने वाट पाहत असून या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज झाले आहे. या पोस्टरमध्ये सुपरस्टार यशचं लूक करारी दिसत आहे. तसेच या पोस्टरमध्ये त्याने भव्य पोशाखात परिधान केला आहे, यश या पोस्टरमध्ये वाढलेल्या दाढीसह कणखर दिसत असून भडकलेली ज्वाला आणि आसनसह दिसत आहे. केजीएफच्या सिक्वेलबद्दलची उत्सुकता वाढवणारे हे पोस्टर आहे.

यापूर्वी संजय दत्तने आपल्या इंस्टाग्रामवर सिनेमाच्या रिलीजच्या तारखेतील बदलाविषयी अपडेट शेअर केले होते. सुपरस्टर यश शिवाय, या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि रवीना टंडन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट हिंदी, मल्याळम, तामिळ आणि तेलगू भाषांमध्येही डब केला जाणार आहे. ‘केजीएफ: अध्याय 2’ 16 जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल होणार होता. परंतु कोरोना साथीमुळे परिणामी लॉकडाऊनमुळे रिलीजची तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे. निर्मात्यांनी अद्याप चित्रपटाच्या नवीन रिलीज तारखेची घोषणा केलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *