Sun. Jun 20th, 2021

बहुप्रतिक्षित हॉरर सिनेमा ‘काळ’ ३१ जानेवारीला प्रदर्शित

बहुप्रतिक्षित हॉरर असलेल्या ‘काळ’ या सिनेमाच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे आता ‘काळ’ हा सिनेमा ३१ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आधी हा सिनेमा २४ जानेवारीला प्रदर्शित केला जाणार होता.

अवघ्या काही दिवसांपूर्वीच ‘काळ’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

या सिनेमाचे नवीन पोस्टर निर्मात्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रदर्शित केले आहे. त्याचबरोबर सिनेमाचा दूसरा ट्रेलर देखील प्रदर्शित करण्यात आला आहे.

ठरला पहिला सिनेमा

काळ’ हा सिनेमा महाराष्ट्राबरोबर परदेशात देखील प्रदर्शित केला जाणार आहे. रशियात हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. रशियातील ३० शहरांमधील एकूण १०० स्क्रीनवर हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. तसेच रशियात प्रदर्शित होणारा काळ हा सिनेमा पहिलाच मराठी सिनेमा ठरला आहे.

डी. संदीप यांनी काळ सिनेमाचं लेखन, दिग्दर्शन आणि संकलन केलं आहे. तर या सिनेमाची निर्मिती फ्रेम्स प्रॉडक्शनचे हेमंत रूपरेल आणि रणजीत ठाकूर तसेच नितिन प्रकाश वैद्य आणि डी संदीप यांनी केलृ आहे.

सतीश गेजगे, संकेत विश्वासराव, श्रेयस बेहेरे, राजकुमार जरांगे, वैभवी चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *