Fri. Sep 30th, 2022

‘कबीर सिंग’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, 5 दिवसांत 100 कोटींचा गल्ला!

शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सिनेमावर टीका होऊनही प्रेक्षकांनी मात्र सिनेमा डोक्यावर घेतला आहे.

शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सिनेमावर टीका होऊनही प्रेक्षकांनी मात्र सिनेमा डोक्यावर घेतला आहे. 21 जूनला रिलीज झालेला ‘कबीर सिंग’ सिनेमा पाचव्या दिवशीच 100 कोटी क्लबमध्ये पोहोचला. शाहिदवरच सर्व भिस्त असलेला हा पहिलाच 100 कोटींच्या घरात पोहोचलेला सिनेमा आहे. हा सिनेमा मूळ तेलुगू ‘अर्जुन रेड्डी’ सिनेमाचा रिमेक आहे. दोन्ही सिनेमांचा दिग्दर्शक संदिप रेड्डी वांगा आहे.

सुरुवातीला शाहिद कपूरचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चालेल का, याबद्दल शंका उपस्थित केली जात होती.

त्यातच या सिनेमातील मुख्य पात्राचं प्रेम, महिलांविषयीची वर्तणूक या मुद्द्यांवरून टिकेची झोड उठली.

सिनेमाची लांबीही 3 तास असल्यामुळे प्रेक्षक कंटाळून निघून जातील, अशीही भीती वर्तवली जात होती.

मात्र प्रेक्षकांना हा सिनेमा खूप आवडला. पहिल्याच दिवशी या सिनेमाने 20.21 कोटी रुपयांची कमाई केली.

विशेष म्हणजे Mouth Publicity च्या जोरावर पुढील दिवसांत या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या दिवशी कमाई वाढली.

दुसऱ्या दिवशी 22.71 कोटी,

तिसऱ्या दिवशी 27.91 कोटी

चौथ्या दिवशी 17.54 कोटी रूपयांची कमाई केली.

शाहिदच्या ‘पद्मावत’ सिनेमानेही पहिल्या दिवशी 19 कोटींची कमाई केली होती. मात्र त्याचं श्रेय रणवीर सिंग आणि दीपिकालाच देण्यात आलं होतं.

शाहिदच्या ‘आर… राजकुमार’ सिनेमानेही बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली असली, तरी ‘कबीर सिंग’ हाच शाहिदच्या एकट्याच्या नावावर 100 कोटी क्लबमध्ये पोहोचलेला पहिला सिनेमा ठरलाय.

विशेष म्हणजे शाहिदच्या ‘कबीर सिंग’ने सर्वाधिक वेगाने 100 कोटींचा पल्ला पार करण्याच्या स्पर्धेतही दुसरा क्रमांक मिळवलाय.

याआधी सलमान खानच्या ‘भारत’ सिनेमाने 4 दिवसांत 100 कोटींचा पल्ला गाठला होता.

पण ‘भारत’ 4700 स्क्रीन्सवर झळकला होता, पण ‘कबीर सिंग’ला मात्र 3123 स्क्रीन्स मिळाल्या आहेत. तरीही ‘कबीर सिंग’ने हा विक्रम केलाय.

अक्षय कुमारचा ‘केसरी’ सिनेमा 3600 स्क्रीन्सवर झळकूनही त्याला 100 कोटींचा पल्ला गाठायला 7 दिवस लागले होते.

तसंच रणवीर सिंगच्या ‘गली बॉय’ सिनेमाला 100 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचण्यासाठी 8 दिवस लागले होते.

कबीर सिंगने मात्र पाचव्या दिवशीच 100 कोटींची मजल गाठून शाहिद कपूरच्या करिअरला नव्याने उभारी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.