Mon. Jul 4th, 2022

काजूची चवदार चवीष्ट उसळ, नक्की करून पाहा

तुम्ही आतापर्यंत कडधान्याची उसळ आणि मिसळ पाहिलीच असेल. पण काजूची मिसळ पण बनते हे ऐकायला नवलचं असलं तरी काजूची उसळही बनवता येते.

काजू हे शरीरासाठी खूप हेल्दी आहे. काजूपासून आपण वेगवेगळे पदार्थ  बनवतो. काजूकतली, काजूची बर्फी, फरसाण, बिरर्याणीमध्ये ही काजूचा वापर केला जातो. आता या काजूची उसळही नक्की करून पाहा.  

साहित्य :

ओले काजू – 1 वाटी

धने – 1 चमचा

जिरं – 1 चमचा

सुकी मिर्ची – 1 किंवा 2 चमचा

ओलं खोबरं – अर्धी वाटी

मीठ चवीनुसार

कृती:-

  • प्रथम ओले काजू पाण्यात टाकून सोलून घ्यावे. त्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यावे. (त्यावर चिक असल्यानं घसा खवखवतो.)
  • त्यानंतर धने, जिरं, आणि सुक्या मिरच्या भाजून घ्या तसेच अर्धी वाटी ओलं खोबरं भाजून घ्या आणि सर्व मिश्रण एकत्र मिक्सरमध्ये वाटून घ्या.
  • नंतर काजू फोडणीला टाका मग एक वाटी पाणी टाका, आणि नंतर त्या मिश्रणाला उकळी येऊ दया.
  • उकळी आल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाका. आशाप्रकारे चवीष्ट आणि आरोग्यदायी काजूची मिसळ तयार.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.