#KalankTeaser: बहुप्रतिक्षीत ‘कलंक’ सिनेमाचा टीजर रिलीज

‘कलंक’ या आगामी सिनेमाचा टीजर रिलीज झाला आहे. वरूण धवन, आलिया भट्ट, माधुरी दीक्षित, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, आदित्य राय कपूर अशा दिग्गजांच्या भूमिकेने सजलेल्या या सिनेमाची उत्सुकता सगळ्यांमध्ये असतानाच आज या चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आला आहे.
2 मिनिट 5 सेकंदांच्या या टीजरमध्ये सिनेमाच्या सर्व पात्रांची झलक पाहायला मिळते.
टीजर बघता, या सिनेमात प्रेम आणि धोक्याची कथा असल्याचे भासते.
‘कुछ रिश्ते कर्जों की तरह होते है, उन्हे निभाना नहीं चुकाना पडता है,’ असा या टीजरमधील वरूणचा एक संवाद मनाला भिडतो.
‘जब किसी की बर्बादी हमें अपनी जीत जैसी लगे तो समझ लीजीए इस दुनिया में हमसे बर्बाद कोई नहीं है,’ हा आलियाचा संवादही दमदार ठरतो.
टीजरमधील भव्य सेट्स लक्ष वेधून घेतात.
टीझरच्या शेवटच्या सीनमध्ये रावणाचा वध होतो आणि आलिया व वरूण एकमेकांना भेटतात, असं दाखवण्यात आलं आहे.
या सिनेमाचे पोस्टर्स पाहून आधीच प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली होती.
टीझर पाहून चाहत्यांची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे.
‘कलंक’ हा सिनेमा येत्या 17 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.