Tue. Oct 19th, 2021

लोकलमध्ये जागेवरुन वाद, प्रवाशांवर मिरची पूड फेकली

जय महाराष्ट्र न्यूज, शहाड

 

लोकलमध्ये जागेवरून वाद नेहमीच होत असतात. मात्र, मध्य रेल्वेच्या शहाड स्टेशनवर जागेच्या वादावरून एका व्यक्तीनं प्रवाशांच्या डोळ्यावर मिरची पूड फेकली. मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडलेला हा प्रकार  CCTVमध्ये कैद झाला.

 

जागेच्या वादावरून त्याचा वचपा काढण्यासाठी हे कृत्य केल्याची कबुली आरोपीनं दिली. आरोपी आधी शहाड रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर उतरला. ज्यांच्याशी भांडण झालं होतं, ते प्रवाशी लोकलच्या गेटवरच उभे होते. त्यामुळे जेव्हा लोकल पुढे निघाली त्याचवेळी फलाटावरुन आरोपीनं मिरचीची पूड फेकली.

 

मिरची पूड अंगावर पडल्याने सात प्रवाशांना डोळे आणि शरीरावर जळजळ झाली. कल्याण रेल्वे स्टेशनवर त्यांना रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि डिस्चार्जही देण्यात आला. प्रवाशांनी केलेल्या तक्रारीनंतर आरोपीला अटक करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *