Sun. Aug 7th, 2022

अशी दोस्ती नको रे भाई; अन् ‘त्या’ मित्रांची मैत्री ‘त्याला’ भलतीच महागात पडली

 

जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण

 

 

नशेखोर मित्रांची मैत्री तरुणाला चांगलीच महागात पडली आहे. नशेसाठी पैसे न दिल्यानं मित्रांनीच तरुणाला मारहाण केली.

 

कल्याणच्या कोळसेवाडी परिसरात ही घटना घडली. निलेश जयस्वाल असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे.

 

निलेशच्या मित्रांनी त्याच्याकडे पैसे मागितले. मात्र, पैसे देण्यास नकार दिल्यानं त्यांनी निलेशनं रॉड आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि त्याच्याजवळचे 5 हजार रुपयेही हिसकावून घेतले.

 

हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय… याप्रकरणी निलेशनं विशाल सिंग, अंकुश सिंग, राज पांडे आणि आशुतोष पांडेविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली… मात्र पोलिसांनी फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.