Thu. May 6th, 2021

कल्याणमध्ये रुग्णांना खुर्चीवर झोपवून ऑक्सिजन पुरवठा

राज्यात कोरोनारुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे प्रशासनासोबत रुग्णालयांवरदेखील ताण आल्याचं चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. कल्याणच्या एका दवाखान्यामध्ये अत्यंत विदारक परिस्थिती पाहायला मिळत आहे. कल्याणमध्ये रुग्णांना खाटा मिळणं खूप कठीण झालं आहे. सरकारी आणि खासगी अशी सर्वच रुग्णालये कोरोना रुग्णांनी भरली आहेत.

आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला आहे. अशा परिस्थितीत अत्यवस्थ किंवा ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना महापालिका रुग्णालयात असलेल्या खुर्च्यांवर झोपवून ऑक्सिजन दिला जात आहे. ही भयानक परिस्थिती हादरवून टाकणारी आहे .कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाचा उद्रेक सुरुच आहे.रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी खाटा उपलब्ध नाहीत, तर खाजगी रुग्णालयात इंजेक्शनचा देखील तुटवडा आहे. सध्याच्या घडीला परिस्थिती इतकी विदारक आहे की, कल्याणमधील रुक्मीणीबाई रुग्णालयामध्ये रुग्णांना खुर्च्यांवर झोपवून ऑक्सिजन दिला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *