कल्याणमध्ये ज्वेलर्सच्या दुकानात भरदिवसा दरोडा

कल्याण- मलंगगड रोडवरील नांदीवली गाव येथील वैष्णवी ज्वेलर्स दुकानात भरदिवसा लूट झाली. तीन जणांनी भर दुपारी केली ही लूट. घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. तीन जणांपैकी एका कडे रिव्हॉल्व्हर होती हे सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत आहे. रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत दरोडेखोरांकडून लूट करण्यात आली.

दरोडेखोरांकडून ज्वेलर्समधल्या कामगारांना मारहाण करण्यात आली होती. डोक्यावर तीक्ष्ण हत्याऱ्याने वार केल्यामुळे दुकानातील कामगार झाले तर त्यातील एक कामगार गंभीरपणे जखमी झाला आहे. एक दुकान कामगाराने एका दरोडेखोराला पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात, तर दोन जण फरार असल्याची प्राथमिक माहिती पोलीसंच्या हाती लागली आहे. कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.

Exit mobile version