संचारबंदीच्या आदेशाला कल्याणमध्ये केराची टोपली

राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र तरीसुद्धा अनेक नागरिक बेजबाबदारपणे वागत संचारबंदीच्या नियमांचं उल्लंघन करताना दिसत आहेत. कल्याण डोंबिवलीत संचारबंदी आहे की नाही, असा सवाल काही घटनांमुळे उपस्थित होत आहे.

कुठे आठवडा बाजार, कुठे बारमध्ये बसून मद्यपान केले जात आहे. कल्याणमध्ये मोठय़ा जल्लोषात हळदी सभारंभ आयोजित करण्यात आल्याचं समोर आलं आहे. या हळदी सभारंभात बैल नाचविले गेले आहेत. त्यावर पैशाची उधळपट्टीदेखील करण्यात आली. या हळदी सभारंभात शेकडो लोक उपस्थित होते.

कल्याण पूर्व भागातील चिंचापाडा गावात हा हळदीचा कार्यक्रम होता. या गावातील रहिवासी प्रकाश म्हात्रे यांच्या मुलाचा हळदी समारंभ आयोजित करण्यात आला होता. प्रभाग अधिकारी दीपक शिंदे यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत असूनदेखील नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत नसल्याचं समोर आलं आहे.

Exit mobile version