Thu. Jun 20th, 2019

कल्याणमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याला सर्व विषयात मिळाले ’35 मार्क’

0Shares

शनिवारी दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वत्र चर्चा होती विद्यार्थ्यांच्या गुणांची. मात्र एकीकडे कल्याणमध्ये सिद्धेश रेडीजला सगळ्या विषयात 35 मार्क मिळाली आहेत. सिद्धेशला सगळ्या विषयात 35 मार्क मिळाल्यामुळे कल्याणमध्ये त्याचीच चर्चा सुरू आहे.

नेमकं प्रकरण काय ?

शनिवारी दहावीचा निकाल जाहीर झाला.

यामध्ये ७७.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

मात्र कल्याण पूर्वेला राहणारा विद्यार्थी सिद्धेश रेडीजला सर्व विषयात 35 गुण मिळाल्याचे समजते आहे.

त्याच्यासोबत दहावीत असलेला मित्राला 84% मिळाले असेल तरी सर्वत्र चर्चा सिद्धेशची आहे.

मराठी, इंग्लिश किंवा गणित असो सिद्धेशला 35 मार्क मिळाल्याचे सिद्धेशने सांगितले.

त्यामुळे सध्या सिद्धेश चर्चेचा विषय ठरला आहे.

 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: