Mon. Sep 27th, 2021

पाकव्याप्त काश्मीर म्हणजे स्वतंत्र काश्मीर – कमल हासन

अभिनेता कमल हासन यांनी राजकारणातही प्रवेश केला आहे. मात्र यानंतर ते बऱ्याचदा वादात सापडले आहेत.

सीआरपीएफच्या जवानांवर पुलवामामध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर कमल हासन यांनी एका मुलाखतीमध्ये पाकव्याप्त काश्मीरला ‘स्वतंत्र काश्मीर’ म्हटलं आहे.

तसेच काश्मीरमध्ये जनमत चाचणी घेण्यात यावी, असेही म्हटले आहे. यामुळे नवीन वाद ओढवण्याची शक्यता आहे.

कमल हासन यांनी एका मुलाखतीमध्ये केंद्राच्या काश्मीरबाबतच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

तसेच सरकार काश्मीरमध्ये जनमत घेण्यासाठी का घाबरत आहे, असा सवालही उपस्थित केला आहे.

जनमत घेतल्यास काश्मीरी नागरिक भारतासोबत येऊ इच्छित असतील, पाकिस्तानमध्ये जाऊ इच्छित असतील किंवा स्वतंत्र देश म्हणून राहू इच्छित असतील, तर ते समजेल.

जनमत घेण्याचा मुद्दा अनेक संघटना उठवत आहेत.

जर भारत स्वत:ला एक चांगला देश म्हणवत असेल तर अशा प्रकारची वागणूक देता कामा नये, असेही कमल हासन यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *