Tue. Sep 28th, 2021

कोरोना रुग्णांसाठी कमल हासन यांचं मोठं पाऊल, आपल्या घराचं रुग्णालयात रूपांतर

कोरोनाची दहशत एवढी वाढली हे की अनेकांचं विलगीकरण केलं जातंय. सोशल डिस्टन्सिंग हाच एकमेव उपाय असल्याचं सांगत पंतप्रधानांनीही लॉकडाऊन घोषित केलं आहे. अशा परिस्थितीत अनेक कलाकार आपल्या परीने जनजागृती करत आहेत. दक्षिण भारतातील कलाकार नेहमीच जनतेसाठी संवेदनशीलता दाखवत असतात. त्यामुळे तेथील जनतेला कलाकारांप्रती विशेष आस्था असते. सुपरस्टार रजनीकांत यांनी सेटवर रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना ५० लाखांची मदत दिली आहे. आता सुपरस्टार कमल हासन यांनी खूप मोठी मदत कोरोनाग्रस्तांना देऊ केली आहे.

ज्या घरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येतो, त्या संपूर्ण इमारतीतील प्रत्येकालाच क्वारंटाईन करावं लागतं, इतकं या कोरोनाची व्हायरसचं स्वरूप भीषण आहे. रुग्णालयांत कोरोनाग्रस्तांसाठी जागा कमी पडत आहे. कारण अशा रुग्णांना आयसोलेशन वॉर्डमध्येच ठेवणं भाग असतं. अशा परिस्थितीत दक्षिण भारतातील अष्टपैलू कलावंत कमल हासन यांनी थेट आपल्या घराचंच रूपांतर कोरोना रुग्णांसाठीच्या रुग्णालयात करण्यास सांगितलं आहे. त्यांनी यासंदर्भात Tweet केलं आहे.  

आपण डॉक्टरांच्या सहाय्याने आपल्या घराचं रूपांतर कोरोनाग्रस्तांच्या रुग्णालयात करण्यासाठी तयार आहोत, असं ट्विटमध्ये स्पष्ट केलं आहे. कमल हासन यांच्या या कृत्याचं सर्वत्र कौतुक होतंय. त्यांनी केलेल्या ट्विटला हजारो लाईक्स मिळाली आहेत. तसंच लोकांनी त्यांचे आभार मानले आहेत. तुम्ही खरेखुरे हिरो आहात, असं अनेकांनी रिप्लायमध्ये म्हटलं आहे.

बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनीही आपल्या पद्धतीने कोरोनापासून लोकांचा बचाव व्हावा यासाठी मदत देऊ केली आहे. अभिनेता हृतिक रोशनने मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना N95 आणि FFP3 मास्क्सचं वाटप केलं होतं. तामिळ अभिनेता कार्ती याने १० लाखांची मदत देऊ केली होती. मात्र स्वतःच्या घराचंच रूपांतर रुग्णांसाठीच्या रूग्णालयात करण्याचा प्रस्ताव ही खूपच मोठी गोष्ट आहे. त्यामुळे कमल हासन यांचं यासाठी कौतुक करावं तेवढं थोडं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *