Mon. Jan 24th, 2022

Twitter वर बॅन होताच स्वदेशी अ‍ॅप कूने (Koo) तिला पाठिंबा दिला

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. ती सोशल मीडियावर सुद्धा बरीच सक्रिय असते. प्रत्येक विषयावर आपलं मत बिनधास्त मांडते. मात्र कंगनाच्या आक्षेपार्ह विधानांमुळे ट्विटरने तिला कायमचं सस्पेंड केलं आहे. त्यानंतर कंगना स्वदेशी अॅप KOO द्वारे आपल्या प्रतिक्रिया मांडणार आहे. कंगनाने बंगाल हिंसाचाराबाबत TMC (तृणमूल काँग्रेस) वर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यामुळे ट्विटरने कंगनाचं अकाऊंट कायमचं बॅन केलं आहे.

ट्विटरच्या म्हणण्यानुसार, कंगनाला वारंवार सांगून सुद्धा तिनं नियमांचं उल्लघंन करत असल्यानं ट्विटरने कठोर पाऊल उचललं आहे. महत्त्वाचं म्हणजे कंगना आधी तिची बहीण रंगोली चंदेलला सुद्धा ट्वीटरवर बॅन करण्यात आलं आहे. अशातच ट्विटरला स्वदेशी पर्याय असणाऱ्या ‘KOO’ ने कंगनाचं स्वागत केलं आहे. KOO चे CEO आणि सहाय्यक संस्थापक अप्रमेय राधाकृष्णन यांनी कंगनाच्या KOO पोस्टचं स्क्रीनशॉट काढत सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे. कंगनाची ही पोस्ट थोडी जुनी आहे. मात्र राधाकृष्णन यांनी ती आता पोस्ट केली आहे आणि त्यासोबतचं म्हटलं आहे. ‘कंगनाचं हे पहिलं KOO आहे. खरंतर हे कंगनासाठी स्वतःचं घर असल्यासारखं आहे आणि इतर सर्व माध्यमांना ती भाड्याचं घर समजते आणि ते अगदी बरोबर आहे. कंगना रणौत अनेक दिवसांपासून ट्विट सोबतच ‘कू’ वर सुद्धा मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *