Jaimaharashtra news

बॉलिवूड क्वीन कंगनाने केली पाकिस्तानची स्तुती, ट्वीट व्हायरल…

बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रणौत ही कायमचं वादग्रस्त ट्विट करत असते आणि बिनधास्त सोशल मीडियावर मत मांडताना दिसते. कंगना तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. यावेळी देखील कंगनाचं ट्विट हे जोरदार व्हायरल होत आहे. आता कंगनाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी सामना करण्यासाठी शेजारचा देश पाकिस्तान आपल्याला मदत करण्यासाठी पुढे येत आहेत.

पाकिस्तानमध्ये ट्विटरवर ट्रेंड होणार हॅशटॅग #PakistanStandsWithIndia वर कंगनाने प्रतिक्रिया दिली आहे. “पाकिस्तानच्या ट्विटरवर टॉप ट्रेंड होणार हॅशटॅग #PakistanstandswithIndia पाहून आनंद झाला. भारताचे वीर पुरूष मोदींनी दिलेल्या लसीचे त्यांनी कौतुक केले, या कठीण काळात आम्ही त्यांच्या सहानुभूतीचा आदर करतो ,” अशा आशयाचे ट्वीट कंगनाने केले आहे. कंगनाचं हे ट्वीट अनेकांच्या नजरेत आलं आहे. शिवाय कंगनाचे काही चित्रपट हे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्यात ‘थलायवी’ , ‘धाकड’ , आणि ‘तेजस’ या चित्रपटाद्वारे कंगना रूपेरी पडद्यावर तिच्या अनोख्या अंदाजात दिसणार आहे.

‘थलायवी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटात कंगना तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच ‘थलायवी’ हा चित्रपट तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ही पुढे ढकलण्यात आली आहे. यानंतर कंगना ‘तेजस’ आणि ‘धाकड’ या दोन चित्रपटांमध्ये दिसेल.

Exit mobile version