Mon. Jan 17th, 2022

कंगना बनणार ‘अम्मा’!

तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर येणाऱ्या बायोपिकमधील मुख्य भूमिकेसाठी बरीच शोधाशोध सुरू होती. अखेर बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिची या भूमिकेसाठी निवड झाली आहे. खुद्द कंगनानेच आपल्या वाढदिवशी हे जाहीर केलंय. यापूर्वी अनेक अभिनेत्रींचा या सिनेमातील जयललिता यांच्या भूमिकेसाठी विचार करण्यात येत होता. अभिनेत्री ऐश्वर्या राय, विद्या बालन, अनुष्का शर्मा यांची नावं या स्पर्धेत होती.

जयललिता यांची कारकीर्द!

तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री ‘अम्मा’ या नावाने अनुयायांकडून संबोधल्या जात.

कन्नड, तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला होता.

वयाच्या 15 व्या वर्षापासून त्यांनी अभिनयाला सुरूवात केली होती.

1982 साली MGR यांच्यासोबत त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात केली.

तमिळनाडूच्या विकासात त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान होतं.

त्यांची राजकीय कारकीर्द ही वादळी ठरली होती.

त्यामुळे लोकप्रिय आणि वादग्रस्त व्यक्तिमत्त्व असणाऱ्या जयललिता यांच्या bio-pic बद्दल लोकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

यांच्या बायोपिकचे दिग्दर्शन दक्षिणेतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक विजय करणार आहेत.

“जयललिता हे आपल्या देशाला लाभलेले मोठे नेतृत्व आहे. त्यांचा बायोपिक बनवणं म्हणजे मोठी जबाबदारी आहे. ठाम निर्णय घेण्याच्या साधर्म्यामुळे या भूमिकेसाठी मला कंगना या भूमिकेसाठी योग्य वाटली. म्हणूनच तिची या भूमिकासाठी निवड करण्यात आली असं विजय़ यांनी कंगना राणौैतच्या निवडीबद्दल सांगितलं.

हा चित्रपट तामिळमध्य़े ‘थलाईवी’ तर हिंदीमध्ये ‘जया’ या नावानं प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *