Sat. Aug 13th, 2022

‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटासाठी दिग्दर्शकांची पहिली पसंती कंगना रणौत

बॉलिवूड किस्सा : अभिनेत्री विद्या बालनला ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटात विद्याने सिल्क स्मिता या अडल्ट स्टारची भूमिका साकारली होती. हा चित्रपट अनेक प्रेक्षकांच्या पसंतीला पडला. या चित्रपटासाठी विद्या बालन ही दिग्दर्शकांची पहिली पसंती नव्हती. या चित्रपटातसाठी चित्रपटासाठी सर्वात आधी कंगना रणौतला विचारण्यात आलं होतं पण तिनं या चित्रपटासाठी नकार दिला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं याविषयी खुलासा केला. कंगनाचं म्हणणं आहे की, ती विद्या बालनपेक्षा उत्तम अभिनय करू शकली नसती. तिनं या चित्रपटात सर्वोत्तम अभिनय केला आहे.

या मुलाखतीत कंगनाला विचारलं, एखादा चित्रपट सोडल्याचा पश्चाताप होतो का? असा प्रश्न केला. त्यावर कंगना म्हणाली, मला वाटतं ‘डर्टी पिक्चर’ तो चित्रपट जेव्हा रिलीज झाला तेव्हा तो उत्कृष्ट होता. पण मला नाही वाटत की, मी विद्या बालनपेक्षा उत्तम अभिनय करू शकले असते. कारण ती खूपच उत्कृष्ट अभिनय केला आहे. पण हो मला कधी कधी वाटतं की मी त्या चित्रपटात पोटेन्शिअल नाही पाहिलं.’ कंगना पुढे म्हटलं, ‘मी मुख्य भूमिका साकारू शकणारी अभिनेत्री फक्त सहकलाकार आणि ऑफ-बीट चित्रपटांमधूनच झाले आहे. मी कधीच राजकुमार हिरानी, संजय लीला भन्साळी किंवा धर्मा प्रॉडक्शन, यशराज फिल्म किंवा कोणत्याही खान अभिनेत्यांचे चित्रपट केलेले नाहीत. पण तरीही मी टॉपच्या अभिनेत्रींमध्ये स्थान मिळवलं. मला डर्टी पिक्चर हिट होईल असं वाटलं नाही पण तो न केल्याचा पश्चाताप मला होत नाही.’ कंगनाला आगामी चित्रपट ‘थलायवी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात कंगनानं तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री आणि अभिनेत्री जे जयललिता यांची भूमिका साकारली आहे. कोरोनामुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्या आहे. शिवाय नव्या रिलीज डेटची घोषणा अद्याप झालेली नाही. तसेच कंगना ही ‘धाकड’ आणि ‘तेजस’ या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.