गृहिणींना वेतन देण्याचं समर्थन करण्यावरून अभिनेत्री कंगना रणौतने शशी थरूरांनाच सुनावलं

अभिनेते कमल हासन यांनी गृहिणी महिलांना पगार देण्याबद्दल विचार मांडला या विचाराशी सहमत काँग्रेस नेते आणि तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर आहे. शशी थरूर यांनी ट्विट करून आपली भूमिका मांडली आहे. त्यानंतर गृहिणींना वेतन देण्याचं समर्थन करण्यावरून अभिनेत्री कंगना रणौतने शशी थरूरांनाच सुनावलं आहे. एमएनएम अर्थात मक्कल निधी मय्यम पक्षाचे अध्यक्ष कमल हासन यांनी गृहिणी महिलांना वेतन देण्याबद्दल विचार मांडला आहे. त्यानंतर या विचाराचे समर्थन करत शशी थरूर यांनी ट्विट करून आपली भूमिका मांडली.
“गृहिणींना वेतन देण्याच्या कमल हासन यांच्या कल्पनेचं मी स्वागत करतो. राज्य सरकारन गृहिणींना मासिक वेतन देणं हे गृहिणींच्या कामाला समाजात ओळख निर्माण करून देईल, त्याचबरोबर त्यांना आर्थिक बळही देईल. गृहिणींची सेवा त्यांची शक्ती आणि स्वायतत्ता वाढवेल आणि सार्वत्रिकपणे मूलभूत वेतन तयार करेल,” असं थरूर यांनी म्हटलं आहे. यावरून कंगनानं ट्विट त्यांच्यावर टीका केली आहे. “जोडादारासोबतच्या सेक्ससाठी आता तुम्ही या कायद्याच्या माध्यमातून प्राइज टॅग लावू नका. महिलांना आपल्या छोट्या घररूपी साम्राज्याची मालकीण बनण्यासाठी पगाराची गरज नाही. आम्हाला मातृत्वासाठी पैसे देऊ नका. प्रत्येक गोष्टीकडे व्यवसाय म्हणून बघणं बंद करा. आपल्या घरातील महिलांसमोर स्वतःला समर्पित करा. त्यांना तुमची गरज आहे. फक्त तुमच्या प्रेमाची, सन्मानाची आणि पगाराची नाही,” असं म्हणत कंगनानं शशी थरूर यांना उत्तर दिलं आहे. गृहिणी महिलांचं स्वातंत्र्य आणि स्वायत्ततेला प्रोत्साहन देण्यासाठी हा विचार कमल हासन मांडला होता. गृहिणी महिलांचं काम व्यवसाय समजण्यात यावं आणि त्यासाठी त्यांना वेतनही दिलं जावं अशी भूमिका कमल हासन यांनी मांडली आहे. त्यानंतर आता कंगना आणि खासदार शशी थरूर यांच्यात एक वाद निर्माण झाला आहे.