पंतप्रधान एक लीडर नसून उत्तम अभिनेते आहेत.” असं म्हणत युजरने कंगनाला ट्रोल केलं

मोदींना नेतृत्व करता येत नाही….मोदीजी कृपया राजीनामा द्या”; कंगना रणौतचं ट्विट चर्चेत सचिन तेंडुलकर आणि लता दीदींचा केला उल्लेख बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत ही नेहमीच तिच्या वादग्रस्त विधानमुळे चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून बिनधास्तपणे तिचं मत मांडताना दिसते. तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच ती चर्चेत असते. तसेच मागील काही दिवसात कंगनाला आपले बिनधास्तपणे मत मांडणे हे तिला महागात पडल्याचं दिसत आहे.
गेल्या काही दिवसात कंगनाने देशीतील घडामोडींवर तिचं मत सोशल मीडियावर मांडलं. यामुळे तिला ट्रोल देखील व्हावं लागलं आहे. कंगनाने एक ट्विट करत तिला ट्रोल करणाऱ्यांना चांगलचं सुनावलं आहे. यावेळी कंगनाने माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि गानसम्रानी लता दीदींचा ट्विटमध्ये उल्लेख केला आहे. कंगना तिच्या ट्विटमध्ये म्हणाली, “मोदींना नेतृत्व कसं करावं हे कळत नाही, कंगनाला अभिनय करता येत नाही, सचिनला बॅटिंग कशी करावी ठाऊक नाही आणि लता दीदींना गाता येत नाही, मात्र या ट्रोलर्सना सगळं माहित आहे.” असं म्हणत कंगनाने युजर्सचा ‘चिंदी’ असा उल्लेख केला आहे. कंगना तिच्या ट्विटमध्ये म्हणाली, ” मोदीजी कृपया राजीनामा द्या आणि विष्णू अवतारातील एखाद्या ट्रोलरला पुढली पंतप्रधान बनवा.” असं ती म्हणाली आहे. ट्रोल करणाऱ्यांचा चांगलाचं समाचार घेतल्यानंतर देखील कंगनाला नेटकऱ्यांनी पुन्हा सुनावलं आहे. एका युजर म्हटलं आहे, “व्वा शंभर टक्के खरं आहे. सचिन आणि लताजींबद्द्ल वगळता. त्यांचा समावेश करू नको. सचिनला क्रिकेट खेळता येतं आणि लताजींना गाता येतं. पण तू आणि मोदीची उत्तम अभिनय जाणता, आपले पंतप्रधान एक लीडर नसून उत्तम अभिनेते आहेत.” तर दुसऱ्या युजरने म्हटलं, “, “फक्त चमचेगिरी कर, देशासाठी काही मदत करू नको, किती पैसे दान केलेस तू, ट्विटरवर संताप दाखवून काही अर्थ नाही.”असं म्हणत युजरने कंगनाला ट्रोल केलं आहे. यापुर्वी देखील कंगनाला अनेकवेळा नेटकऱ्यांनी सुनावलं आहे. कंगनाला गेल्या काही दिवसात अनेकदा ट्रोल केल्या गेलं आहे.
XMA Header Image Hashtaggen #resign_pm_modi på Twitter twitter.comModi ji does not know how to lead, Kangana does not know how to act, Sachin does not know how to bat, Lata ji does not know how to sing, magar these chindi trolls know everything, please #Resign_PM_Modi ji and make one of these Vishnu avatar trolls next Prime Minister of India 🙏
— Kangana Ranaut (@KanganaTeam) April 27, 2021
I appreciate, cause I found just what I was looking for. Zauberkunst and Zauberei for u. Youve ended my four day long hunt! God Bless you man. Have a nice day. Bye