Mon. Jan 17th, 2022

ईदच्या शुभेच्छा दिल्याने कंगना रणौत ट्रोल

वादग्रस्त विधान करणारी अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आपल्या खळबळजनक वक्तव्यामुळे कंगनाला ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं होतं. सतत वादग्रस्त वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण केल्याचं कारण देत ट्विटरने ही कारवाई केली होती. असं झाल्यावरही कंगना थांबली नाही यापुर्वी सुद्धा तिच्या बहिणीच म्हणजे रंगोलीचे टि्वटरने अकाऊंट सस्पेंड केलं होते. मात्र तरीही कंगना सतत वादग्रस्त ट्विट करत होती. कंगना सध्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून वादग्रस्त वक्तव्य करत आहे. कंगना तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम ट्रोल होत आली आहे. मात्र यावेळी कोणतही वादग्रस्त वक्तव्य केलेलं नसतानाही ती ट्रोल झाली आहे. कंगनाने सोशल मीडियावर चाहत्यांना रॉयल लूकमधील फोटो शेअर करत ईदच्या शुभेच्छा दिल्य़ा. मात्र यानंतर नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. एक ट्रोलर म्हणाला, “या ईदच्या निमित्ताने तू शपथ घे की तू एक माणूस बनशील.”तर दुसरा म्हणाला, ” मला आश्चर्य वाटतंय काल पर्यंत तू इस्लामोफोबिया आणि खोटी, निराधार माहिती पसरवत होतीस. काहीही माहिती नसताना तू एका पक्षावर आरोप केलेस आणि दुसऱ्या दिवशी तू ईदच्या शुभेच्छा देत आहेस.” असं म्हणत युजरने संताप व्यक्त केलाय. तर एका नेटकऱ्याने कंगना दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं आहे. ” हिंदू आणि मुस्लिमांमध्ये भेद का निर्माण करतेस ? सर्वात पहिले आणि महत्वाचं म्हणजे आपण सर्व माणसं आहोत. हे लक्षाच ठेव आणि मग तुझं मत दे. कृपा करून तुझी मानसिकता बदल.” असं म्हणत युजरने संताप व्य़क्त केला आहे. इस्त्रायल आणि पॅलेस्टाइनमधील वादातही कंगनाने उडी घेतली होती. ” कट्टरपंथी इस्लामी दहशतवादाच्या या युद्धात भारत इस्लायलसोबत आहे. आपल्या राष्ट्राचं दहशतवादापासून रक्षण करणं प्रत्येक राष्ट्राचा अधिकार आहे आणि भारत इस्रायलसोबत आहे.” या पोस्टनंतरही कंगना ट्रोल झाली होती. “कंगना भारताची परराष्ट्र मंत्रा आहे का?” अशा आशयाच्या कमेंट करत कंगनाला ट्रोल करण्यात आलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *