Sat. Nov 27th, 2021

कंगनाचा पुन्हा एकदा करण जोहरवर निशाणा

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि दिग्दर्शक-निर्माता करण जोहर यांच्यात मागील बऱ्याच काळापासून वाद सुरू आहेत. कंगनानं करण जोहरवर बॉलिवूडमधील घराणेशाहीला पाठिंबा दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ती अनेकदा करणवर टीका करताना दिसली. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर तर तिनं करणवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. आता कंगनाने पुन्हा एकदा करणवर निशाणा साधला आहे.

कंगनानं ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात करणाच्या डान्ससोबत कंगनाच्या आगामी चित्रपटातील ‘चली-चली’ गाण्याचा ऑडिओ एडिट करून लावण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये करण जोहर एका कार्यक्रमात डान्स करताना दिसत आहे. कंगनानं हा व्हिडीओ शेअर करताना ‘आतापर्यंतचा सर्वात बेस्ट’ असं लिहिलं आहे.
या आधीही कंगनानं अशाचप्रकारे नाव न घेता करण जोहरवर टीका केली होती. ‘कॉफी विथ करण’च्या मुद्द्यावरून कंगनानं करणवर निशाणा साधला होता.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर येत्या २३ एप्रिलला तिचा ‘थलायवी’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ज्यात कंगना तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या व्यतिरिक्त कंगनाकडे ‘धाकड’ आणि ‘तेजस’ हे चित्रपट सुद्धा आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *