‘मला डॉक्टर्स धमकावत आहेत’, कनिका कपूरची तक्रार

गायिका कनिका कपूर हिने आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं कबूल केल्यानंतर आता तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिने लंडनहून येताना कोरोना चाचणी चुकवत लखनौला प्रवेश केला होता. तसंच त्यानंतर तिने पार्टीमध्ये सहभाग घेतला. त्यामुळे तिच्यामुळे अनेकजणांना कोरोनाची लागण झाल्याची भीती निर्माण झाली आहे. कनिकाविरोधात त्यामुळे गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. तिला सध्या रुग्णालयात ठेवण्यात आलंय. मात्र आता कनिका कपूर रुग्णालयाबद्दल तक्रार करत आहे.

सध्या लखनौच्या किंग जॉर्ज रुग्णालयात कनिकाला आयसोलेशनमध्ये ठेवलंय. मात्र इथे डॉक्टर्स आपल्याला धमकावत असल्याचं कनिकाने म्हटलंय. ‘मी रुग्णालयात आहे. पण इथे ना काही खायला आहे, ना काही प्यायला. डॉक्टर्स मला धमकावत आहेत की माझी माहिती लपवून मी मोठा गुन्हाच केलाय. मी तपासणी चुकवून लखनौमध्ये दाखल झाल्याचा आरोप माझ्यावर केला जातोय.’ असं कनिकाचं म्हणणं आहे.

यावेळी तिने आपल्यावर होणाऱ्या आरोपांचं खंडन केलं आहे. ‘माझ्या बाबतीत अफवा पसरवल्या जात आहेत. मी तपासणी चाचणी चुकवून आलेली नाही. मी एक सुशिक्षित व्यक्ती आहे. मी खूप मेहनत करते. मी अशा प्रकरे पळून का येईन?’ असा सवाल तिने केला आहे. तसंच रुग्णालयाच्या व्यवस्थेबद्दल तक्रार ती करत आहे.

Exit mobile version