Thu. Dec 2nd, 2021

कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांचे निधन

  कन्नडमधील प्रसिद्ध अभिनेता पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या ४६व्या वर्षी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. आज सकाळच्या सुमारास तब्येत बिघडल्यामुळे त्यांना बंगळुरूमधील विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

 पुनीत राजकुमार यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वात शोककळा पसरली असून टॉलीवूड, बॉलीवूड आणि क्रिकेट जगतातूनही श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद आणि बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांनी पुनित राजकुमार यांच्या निधनामुळे दु:ख व्यक्त केले आहे.

 पुनीत राजकुमार हे टॉलीवूडमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेता होते. त्यांनी कलाक्षेत्राला २९हून अधिक सुपरहिट चित्रपट केले आहेत. युवर्थना हा त्यांचा शेवटचा चित्रपट असून याचवर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटील आला. तसेच त्यांनी अभी, वीरा, कन्नडिगा, अजय, अरासु, राम, हुडुगारु,  आणि अनजनी पुत्र या चित्रपटात काम केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *