कपिल देवने विराट कोहलीच्या ऑस्ट्रेलियाचा दौरा अर्धवट सोडण्याच्या निर्णयाचे केले समर्थन

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कपिल देव यांनी विराट कोहलीच्या पहिल्या मुलाच्या जन्मासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा अर्धवट सोडण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. तसेच कपिल देव यांनी त्यांच्या काळातील काही गोष्टी शेअर करत म्हणाले की, त्यांच्या काळात असं करणं अशक्य होतं मात्र आता असं शक्य आहे.

हिंदुस्तान टाईम्स लीडरशिप कार्यक्रम दरम्यान या विषयावर बोलताना माजी कर्णधार म्हणाला ‘ की, आमच्या काळात जाण्याचा इतका खर्च करू शकत नसल्यानं ”सुनील गावस्कर यांनी अनेक महिन्यांपासून आपल्या मुलाला पाहिले नव्हते तो एक वेगळा काळ होता. आता पहा, काळ बदलला आहे. “

त्यानंतर कपिल देव म्हणाले, जेव्हा विराटचे वडील मरण पावले होते, तेव्हा तो दुसर्‍याच दिवशी क्रिकेट खेळण्यासाठी परत आला होता. आज आपण त्याच्या मुलासाठी सुट्टी घेण्याबद्दल बोलत आहोत. आता काळाच्या बदल्यामुळे सध्याच्या क्रिकेटमध्ये अशा सुट्ट्या घेणे शक्य होते जे यापूर्वी झाले नव्हते.

पुढे ते म्हणाले की, “जेव्हा आपण विमान विकत घेऊ शकतो तर तीन दिवसांत घरी परत येऊ शकता. आजचे खेळाडू अशा पातळीवर पोहोचले आहेत त्यांना जे वाटते ते सहज करू शकतात आणि मला या गोष्टीचा अभिमान वाटतो. ‘मी आनंदी आहे, विराट आपल्या कुटूंबाला भेटायला परत येत आहे. ‘मी समजू शकतो आहे की आपल्यात एक आवड आहे खेळाविषयी परंतु सर्वात मोठा आनंद म्हणजे तो वडील होण्याचा आहे. ” असं कपिल देव यांनी म्हटलं.

टीम इंडियाचा कर्णधार कोहलीने डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या चार सामन्यांतील कसोटीचा पहिला सामना खेळून पत्नी अनुष्का शर्मा जवळ जाणार आहे कारण पहिल्या मुलाच्या जन्माच्या वेळी तो हजर असणार आहे. पहिला सामना खेळल्यानंतर भारतात परतण्याचा निर्णय विराटने घेतला आहे. यासाठी विराटचे खूप कौतुक होत आहे.

Exit mobile version