Tue. Oct 26th, 2021

आम्हाला दहशतवाद्यांचे मृतदेह पाहायचे आहेत, पुरावे द्या – कपिल सिब्बल  

काश्मीरच्या पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायूसेनेने पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) बालाकोट येथे 26 फेब्रुवारीला हवाई हल्ले करत जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ नष्ट केले होते.

वायूसेनेच्या या कारवाईचे प्रत्येकजण कौतुक करत आहे. पण आता यावरुनही राजकारण सुरू झाले आहे.

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी बालाकोट एअर स्ट्राइकबाबत प्रश्न उपस्थित करत, सरकारने याबाबत पुरावे प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे.

कपिल सिब्बल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, पंतप्रधान मोदीजी आंतरराष्ट्रीय माध्यमे, न्यूयॉर्क टाइम्स, लंडनमधील माध्यम समूह, वॉशिंग्टन पोस्ट, डेली टेलिग्राफ, द गार्डियन, रॉयटर्स यांनी दिलेल्या वृत्तानुसार, बालाकोटमध्ये दहशतवाद्यांचे कोणतेही नुकसान झालेले नाही ? तुम्ही दहशतवाद्याचे राजकारण करण्याचे दोषी आहात काय ?

तुम्ही दहशतवादावर राजकारण करु नये. गुप्तचर यंत्रणेला इतके मोठे अपयश आले आहे.

याचा जबाबदार कोण आहे. याला जबाबदार असणाऱ्यावर तुम्ही काय कारवाई केली आहे.

तुम्ही राजकारण करत आहात. आम्हाला एअर स्ट्राइकमध्ये मारले गेलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह पाहायचे आहेत.

यामुळे देशातील जनतेला आणि शहिदांच्या कुटुंबीयांनाही समाधान लाभेल, असं त्यांनी म्हटलं आहे.

आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या या वृत्तावर पंतप्रधानांनी बोलले पाहिजे.

या माध्यमांनी एअरस्ट्राइकमध्ये क्वचितच कोणी मृत पावल्याचे म्हटले आहे.

मी पंतप्रधान मोदींना विचारु इच्छितो की, आंतरराष्ट्रीय माध्यमे पाकिस्तानचे समर्थन करत आहेत का ? जेव्हा आंतरराष्ट्रीय माध्यमे पाकिस्तानविरोधात बोलतात, तेव्हा तुम्ही खूप खूश होतात. जेव्हा ते प्रश्न उपस्थित करतात.

तेव्हा ते पाकिस्तानला समर्थन देत आहोत का ?

कपिल सिब्बल हेच नव्हे तर दिग्विजय सिंह आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही केंद्र सरकारला एअर स्ट्राइकचे पुरावे मागितले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *