Wed. Aug 10th, 2022

‘गली बॉय’नंतर करण जोहरने पुन्हा बनवली रणवीर-आलियाची जोडी

मुंबई : बॉलिवूडमध्ये आपली एक स्वतंत्र ओळख असलेला बहुगुणी दिग्दर्शक करण जोहर ५ वर्षानंतर दिग्दर्शनसाठी पुन्हा उतरणार असून धर्मा प्रॉडक्शनच्या वतीने लवकरच एक प्रेमकथा घेऊन ते प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘रॉकी और राणी की प्रेमकहानी’ असे या चित्रपटाचे शीर्षक असून या चित्रपटात रणबीर आणि आलिया पुन्हा एकदा एकत्ररूपेरी झळकणार आहे. करण जोहरने नव्या चित्रपटाची घोषणा ही सोशल मीडियावर द्वारे केली आहे. करण जोहरने एक व्हिडिओ जारी केला आहे या व्हिडिओत यात ‘रॉकी और राणी की प्रेमकहानी’ या आगामी चित्रपटाची झलक दाखवली आहे.

या चित्रपटात बर्थ डे बॉय रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. रणवीर सिंगच्या वाढदिवसादिवशी या चित्रपटाची घोषणा करुन करण जोहरने त्याला जणू वाढदिवसाची गिफ्टच बहाल केली आहे. करण जोहरने पाच वर्षानंतर पुन्हा दिग्दर्शनाच्या आपल्या आवडत्या कामाकडे वळायचे ठरवले आहे. रणवीर सिंग आणि आलिया भट्टसह ‘रॉकी और राणी की प्रेमकहानी’ हा चित्रपट बनवत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.