Mon. Jan 24th, 2022

नेहा धुपियाने करण जोहरला तीनवेळी लग्नासाठी प्रपोज करूनही दिला होता नकार; कारण जाणून घेतल्यावर व्हाल थक्क….

मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता करण जोहर हा नेहमीच चर्चेत असतो. करण हा अजूनही अविवाहित आहे. मात्र लग्न केले नसलं तरी तो सरोगसीच्या माध्यमातून दोन मुलांचा पिता बनला आहे. यश आणि रूही असे त्याच्या मुलांची नाव आहे. सध्याला करण हा पुन्हा चर्चेत आला आहे ते म्हणजे एका विचित्र गोष्टीमुळे कारण ऐकल्यावर तुम्हीही व्हालं थक्क सध्याला नेहा धुपिया आणि करण जोहर यांच्या बाबत चर्चा सुरू झाली आहे. नेहाला बॉलिवूडचा निर्माता करण जोहरबरोबर लग्न करायचे असल्याचं तिने नुकतेच सांगितले आहे. नेहाने ‘नो फिल्टरविथ नेहा’ या टॉकशो मध्ये करणसोबतचा हा खास किस्सा सांगितला. नेहाने तिच्या संपूर्ण आयुष्यात केवळ करण जोहरलाच सगळ्यात जास्त लग्नासाठी विचारले असावे असं तिने सांगितले. नेहाने तीनवेळा करणला लग्नासाठी प्रपोज केले होते. मात्र या तिन्ही वेळा करणने नेहाला नकार दिला होता. कारण करणला नेहाच्या शरीराच्या कोणत्याही पार्टमध्ये इंटरेस्ट नव्हता. म्हणून त्याने नेहा वारंवार लग्नासाठी नकार दिल्याचे धक्कादायक खुलासा झाला आहे. करण जोहरने नेहाला नकार देण्यामागे कारण हे फार विचित्र होत. तसेच करण जोहरच पहिलं प्रेम हे ट्विंकल खन्ना असून हे दोघेही एकत्र कॉलेजमध्ये होते. त्यामुळे करणचं ट्विंकलवर प्रेम होतं. मात्र अक्षयच्या एंट्रीमुळे करणचंही हार्टब्रेक झालं. त्यानंतर करणला करिना कपूर आणि अनुष्का शर्मा या देखील अभिनेत्री आवडल्या होत्या मात्र करणच लक फारच वाईट निघाल या अभिनेत्रीपैकी एकानेही करणसोबत लग्न केलं नाही. करणने त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात ही साहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्याचा पहिला चित्रपट ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा होता. तिथेच तो चित्रपट निर्मितीतील बारकावे शिकला आणि ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या दिग्दर्शकीय करियरला सुरुवात केली. त्याला पहिल्याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर त्याने ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनं जिंकली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *