Jaimaharashtra news

करणच्या नव्या ‘बॅच’चा ट्रेलर रिलीज

‘स्टुडंट ऑफ दी इअर 2’ सिनेमाची प्रतिक्षा आता संपली आहे. याचा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. करण जोहरच्या सात वर्षांपूर्वी आलेल्या ‘स्टुडंट ऑफ दी इअर’ या सिनेमाचा हा सिक्वेल आहे. या सिनेमामध्ये दोन नव्या अभिनेत्री म्हणजेच तारा सुतारीया आणि अनन्या पांडे पहिल्यांदा सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करत आहेत. तर टायगर श्रॉफ लिडींग रोलमध्ये आहे. धर्मा प्रोडोक्शनच्या बॅनरखाली हा सिनेमा असल्याने रोमान्स, ऍक्शन, ड्रामा, डान्स यांचा आस्वाद घेता येणार आहे.

 असा आहे ‘स्टुडंट ऑफ दी इअर 2’  चा  ट्रेलर ?

करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ दी इअर’ या सिनेमाचा सिक्वेल आता येणार आहे.

‘स्टुडंट ऑफ दी इअर 2’ या सिनेमामध्ये दोन नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत.

चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे आणि तारा सुतारिया या सिनेमातून पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत.

यामध्ये टायगर श्रॉफ लिडींग रोलमध्ये आहे.या सिनेमाचा ट्रेलर सध्या रिलीज झाला आहे.

तेव्हा करणची ही नवी बॅच आधीच्या बॅचसारखीच रेकॉर्ड करणार का? ते पाहावं लागेल.

 

 

Exit mobile version