Mon. Aug 19th, 2019

‘कलंक’ सिनेमातील वरूण धवनचा फर्स्ट लूक रिलीज

27Shares

धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली बनत असलेला ‘कलंक’ सिनेमातील अभिनेता वरूण धवनचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे. यात वरूण धवन खूपच वेगळा दिसतो आहे.

वरूणसोबतच या सिनेमातील आदित्य रॉय कपूरचा लूक निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

करणने वरूणचा ‘कलंक’ सिनेमातील लूक शेअर करीत म्हटले की, ‘जफरच्या लूकमध्ये वरूण धवन. जो आपल्या जीवनासोबत आणि धोक्यांसोबत फ्लर्ट करतो.’

करण जोहरने बुधवारी म्हणजेच 6 मार्चला ‘कलंक’चा फर्स्ट लूक रिलीज केला होता. हा लूक पाहून या सिनेमाबाबतची उत्सुकता वाढली होती.

यामध्ये पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेली पाठमोरी एक मुलगी व तिच्या मागे एक मुलगा शिकारात बसलेला दिसतो आहे.

त्यात आता वरूणचा लूक पाहिल्यानंतर आता या सिनेमाची उत्सुकता वाढली आहे.

या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज करून करणने म्हटले की,’ हा एक असा सिनेमा आहे ज्याची कल्पना 15 वर्षापूर्वी सुचली होती.

हा असा सिनेमा आहे ज्यावर माझा विश्वास आहे. माझ्या वडिलांनी आम्हाला सोडून जाण्यापूर्वी या सिनेमावर आम्ही एकत्र काम केले होते. त्यांना हा सिनेमा बनलेला पाहायचा होता.

मात्र मी त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकलो नव्हतो. आता त्याची ही इच्छा पूर्ण होणार आहे.

आकंठ बुडालेल्या प्रेमकथेला आता आवाज मिळाला आहे. हा सिनेमा अभिषेक वर्मनने बनवला आहे.

कलंकच्या यात्रेला सुरूवात होणार आहे. यासाठी मी खूप उत्सुक व भावूक झालो आहे.

अजरामर राहणाऱ्या या प्रेमाला तुम्ही देखील पाठिंबा द्याल, अशी आशा आहे.’

‘कलंक’ सिनेमात माधुरी दीक्षित, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, आलिया भट, वरूण धवन, आदित्य रॉय कपूर व कुणाल खेमू मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

हा सिनेमा येत्या 19 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

27Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *