Mon. Jan 24th, 2022

Koffee With Karan: …आणि करिना म्हणते ‘अमृता सिंगला आतापर्यंत भेटलेच नाही’

लोकप्रिय शो ‘Koffee with Karan 6’च्या फिनाले एपिसोडमध्ये करिना कपूर आणि प्रियंका चोप्रा यांनी हजेरी लावली आणि अनेक रहस्यांवरून पडदा उठला.

या एपिसोडमध्ये एकीकडे मलायका अरोरा व अर्जुन कपूरच्या अफेअरवर शिक्कामोर्तब झाले.

तर दुसरीकडे कार्तिक आर्यन व सारा अली खानच्या आगामी सिनेमाचाही खुलासा झाला.

याशिवाय करिनाने आणखी एक मोठा खुलासा केला.

सैफ अली खानची एक्स वाईफ अमृता सिंग हिच्याबद्दल करिना बोलली.

करणने करिना कपूरला अमृतासिंगबद्दल छेडले. अमृतासोबत तुझे नाते कसे आहे? असे करणने करिनाला विचारले.

अमृताचा विषय करिना टाळेल असे वाटत असताना करिनाने मात्र करणच्या प्रश्नाला अगदी बेधडक उत्तर दिले.

तिने सांगितले की सैफसोबत लग्न झाले तेव्हापासून मी एकदाही अमृताला भेटलेले नाही. पण मी अमृताचा प्रचंड आदर करते.

‘कभी खुशी कभी गम’च्या सेटवर मी एकदा अमृताला भेटले होते. त्यावेळी अमृता साराला घेऊन माझ्याकडे आली होती.

सारा माझी खूप मोठी फॅन होती. तिला मला भेटायचे होते. त्यावेळी मी व अमृता एकमेकींशी बोललो होतो.

माझे पती सैफ अली खानच्या दोन्ही मुलांचे संगोपण अमृताने एकटीने केले. मुलांना घडवण्याचे सगळे श्रेय तिचे आहे. त्यामुळेच तिच्याबद्दल माझ्या मनात अपार आदर आहे.

सैफने मला प्रपोज केले, त्यावेळी माझी दोन मुले आहेत आणि ते माझ्या जीवनाचा भाग आहेत, असे सांगितले होते, असेही करिनाने सांगितले.

कार्तिक आर्यन व सारा अली खान लवकरच एका सिनेमात झळकणार आहेत.

हा एक बिग बजेट सिनेमा असेल, असा एक खुलासाही करिनाने या ‘Koffee with Karan 6’मध्ये केला आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *