Tue. Aug 20th, 2019

काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवणार का? करिना कपूर म्हणाली…

0Shares

अभिनेत्री करिना कपूर खान हिने आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ‘राजकारणात उतरण्याचा माझा कोणताही विचार नाही, केवळ अभिनयावरच लक्ष केंद्रीत करायचे आहे’.

असे म्हणत करिनाने काँग्रेसकडून भोपाळमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता स्पष्टपणे नाकारली आहे.

‘चित्रपट हेच माझे ध्येय आहे, मी निवडणूक लढवणार असल्याचे वृत्त पूर्णतः निराधार आहे. मला कोणत्याही पक्षाने निवडणुकीबाबत विचारणा केलेली नाही’, असे बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरने स्पष्ट केले आहे.

‘भोपाळच्या जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाचे निर्विवाद वर्चस्व आहे. त्यामुळे जर करिना कपूरला उमेदवारी दिली तर तिला तरुणांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळू शकतो आणि भाजपाच्या बालेकिल्ल्याला हादरा देऊ शकतो. याशिवाय करिना कपूर ही पतौडी कुटुंबाची सून झाली आहे, परिणामी जुन्या भोपाळमध्ये काँग्रेसला तिच्या उमेदवारीचा चांगला फायदा होऊ शकतो.

महिला असल्यामुळे महिलांकडूनही तिला पाठिंबा मिळेल’, त्यामुळे करिनाला उमेदवारी देण्याबाबत विचार व्हावा अशी मागणी मध्य प्रदेशमधील काँग्रेसच्या काही नेत्यांनी केली होती.

पण आता खुद्द करिनानेच आपण निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

 

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *