Thu. Jun 17th, 2021

अभिनेत्री करीना आता होणार ‘सीता’; भूमिकेसाठी मागितली एवढे कोटी रुपयाची रक्कम…

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करिना कपुर ही सध्याचा चर्चेत आली आहे. करिनाला नव्या चित्रपटाची ऑफर आली आहे. या चित्रपटाचं नाव ‘सीता’. असून चित्रपटाची भूमिका पूर्णपणे सीता या भूमिके भोवती फिरताना दिसणार आहे. चित्रपटची घोषणा केल्यानंतर ‘सीता’ या भूमिकेसाठी अनेक अभिनेत्रींची नावे समोर आले आहेत. त्यामधील एक म्हणजे अभिनेत्री करीना कपूरच देखील आहे. मीडिया रिपोर्टनुसार करीनाला या चित्रपटाची कथा आवडली आहे. तसेच करीनाने ‘सीता’ या भूमिकेसाठी 12 कोटी रूपयांची मागणी केली आहे. सांगायचं झालं तर करीनाकडे अनेक प्रोजेक्ट आहेत. त्यामुळे या चित्रपटासाठी करीना वेळ देवू शकते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. म्हणून निर्माते आणि दिग्दर्शक ‘सीता’साठी करीनाची निवड करतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्याला करिना ‘वीरे दी वेडिंग 2’ (Veere Di Wedding) आणि हंसल मेहता दिग्दर्शित एका चित्रपटात काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *