Thu. Mar 21st, 2019

करिनाच्या चाहत्यांसाठी खुशखबर!

0Shares

करिनाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नेहा धुपिया, करण जोहर यांच्या नंतर आता करिनाही लवकरच रेडिओ जॉकिच्या भूमिकेत दिसणार आहे. करिना तिचा पहिला रेडिओ चॅट शो घेऊन येत आहे. हा शो कधी सुरू होणार याची उत्सुकता अनेकांना होतेच आता चाहत्यांची उत्सुकता न ताणता 10 डिसेंबरपासून करिनाचा हा शो सुरू होणार आहे.

‘What Woman Want’ असे करिनाच्या नव्या रेडिओ शोचं नाव असणार आहे. या शोचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. या रेडिओ शोसाठी करिना आपल्या अनेक सहकलाकारांना आमंत्रित करणार आहे. यात तिची सर्वात जवळची मैत्रीण अमृता अरोरापासून ते सनी लिओनीचाही समावेश असणार आहे. या चॅटशोदरम्यान करिना त्याचं भावविश्व, त्याच्या मनातील गोष्ट उलगडणार आहेच पण एक महिला म्हणून नेमकं त्यांना काय हवंय या गोष्टीचा ठावही ती घेणार आहे.

या चॅटशोसाठी काही महिन्यांपूर्वी मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये मल्लिका दुवा, झोया अख्तर, करिश्मा कपूर सोहा अली खान अशा अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. इश्क 104.8 एफएम वाहिनीसाठी करिना हा चॅट शो करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *