Fri. Jan 21st, 2022

आषाणे धबधब्यात वाहून गेले बापलेक

जय महाराष्ट्र न्यूज, कर्जत

 

पाच दिवसांपूर्वी कर्जत तालुक्यातील आषाणे धबधब्यामध्ये बापलेक वाहून गेल्याची घटना घडली होती.

 

एक ओढा पार करताना तेजसने आईचा हात सोडून बाबांचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचा पाय घसरला आणि ती पाण्याच्या वाहत्या प्रवाहात सापडली तिला

वाचवण्यासाठी तिचे वडिल किरण बोराडे यांनी डोहात उडी घेतली. पण, दोघं बाप, लेक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.

 

अथक प्रयत्नानंतर दुसऱ्या दिवशी किरण बोराडे यांचा मृतदेह बचाव पथकाला सापडला पण तेजसचा मृतदेह अद्याप सापडला नाही. तेजसला अभिनयाची आवड

होती. तिने खो- खो या मराठी चित्रपटात सुपरस्टार भरत जाधव सोबत ‘हलकेच नजर भिडली ,हलकेच दगा केला’ या गाण्यात सामुहिक डान्स देखील केला. आज या

बालतारकेच्या वाटेकडे तीची आई डोळे लावून बसली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *